Friday, March 19, 2010

फुलपाखरू


फुलपाखरा परी रंग माझे
स्वच्छंद हे बागडणे
प्रत्येक फुलावरी डोलायचे
रसपान करीत हुंदडायचे
फुलापरी उमलायचे
रंग उरी उधळायचे
स्मितहास्य करीत
प्रत्येकाला प्रसन्न करायचे
वाऱ्या परी स्पर्शून हलकीच
सावरावी बट मग
चुम्बावे ओठावरी
नि जागवावी प्रीत तुझ्या मनी

Manpakhru


आता होते पाखरू
डोळे भरून पाहीन म्हटलं,
तसं कसं आत्ताच उडालं !
भूराकन उडून कसं दिसेनासं झालं !
येईन पुन्हा फिरून
म्हणून डोळे वाटी लागले .
नी म्हटलं आले आत्ता म्हणजे ,
डोळे भरून पाहीन ,
डोळे भरून आले पण ,
पाखरू नाही आले ....
इवलासा जीव त्याचा
किती भिरभिर फिरणार ?
चिमुकल्या जिवा कसा
थकला भागला झाला ?
चिमुकला जीव माझा
किती तग धरणार.
आले होते आशेनें
पण... निराशेच्या पायी
जीव व्याकूळ चिमुकला
जीव गेला उडून ....
आकाशी फडफडवत पंख ......
पाखरू ....राहील ..जमिनीवर .
आत्ता होत पाखरू ,
कुठे गेलं पाखरू ,...
कुठे गेलं हे पा......ख...रु ...