Thursday, September 20, 2012

पाहुणा


                 
नेहमीच काही आठवणी दुःख देतात असे नाही,काही सुखाऊनही नेतात
अशाच काही आठवणींनी मन भरून आले.
       खरंय माझ्याजवळ स्वतःच चार भिंतीच असं घर नाही,पण
घरपण देणारी माणसं मात्र मिळवलीत .त्या प्रत्येक माणसांच्या
मनात मी व माझ्या मनात त्या प्रत्येकानं घर केलं होतं.आयुष्यात
मला धन्य वाटते ती याची कि मला माणसं कमावता आलीत,याचा
अर्थ मी माणसं विकत घेतली असा नव्हे.प्रेमानं आपलंसं केलं.अर्थात
त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या वाट्याला मी माझ्या प्रेमानं बेरीज न करता
चक्क गुणले त्यामुळे ते प्रेम आजही मला पुरतंय.
        आजकाल लोकांना घरी बोलावूनही एकमेकांकडे येत नाहीत.
पण माझ्याकडे न बोलावता येतात.पुन्हा पुन्हा येतात हे माझे भाग्य
समजते कारण येतांना प्रत्येक पराका येतो नी आपला समजून परत
जातो,आपुलकीनं पुन्हा येतो तेंव्हा आपलंसं करून परत जातो, नी पुन्हा
आपलंसं म्हणून येतो, नी नातं जुळवून जातो आपलेपणाचं. सख्ख होऊन
मायेची उब देतो. असा माझा आपुलकीचा प्रेमाच्या कमाईतून मिळालेला
भर भक्कम बुरुजरुपी वाद्यातला पाहुणचार अनुभवायला कधी विसरू नका.......          

सोपे झटपट नी खुसखुशीत शक्करपारे



----------------------------------------

दुध,तेल,साखर प्रत्येकी एक कटोरी त्यात
जितका मैदा बसेल तितका टाकून मळून
लाट्या करून लाटावेत नी शक्करपारे कापून
गुलाबीसर तळावेत.गरमा गरम खाऊन
उरल्यास शेजारी चवी करता पाठवावेत .
नक्कीच रेसीपी मागतील.आनंदाने द्या म्हणजे
 दिलेलं भांड भरलेलं परत मीळेल .करुन तर बघा ...            

समज




  

आयुष्य जगत असतांना,
तुला समजायला वेळच
मिळाला नाही. तुला समजावं
वाटलं तेंव्हा आयुष्यच संपत
आलेलं होतं ....

वो पन्ना


       



यह मेरी डायरी का पन्ना है.
जो मैने आपकी किताब से चुराया था.  
हम तो बादमे कभी मिले नहीं ,पर यहीं  
पन्ना मै बार बार पढती हूँ .और जब भी
इसे पढती हूँ तब आप मेरे करिब आते हो.
यही पन्ना पुरानी यादे ताजा करता है.इस
पन्ने के सहारे सारे गिले शिकवे भूल जाती
हूँ .जो लम्हें हमने घडीभर साथ गुजारे,वोही
लम्हे मेरे जिने का सहारा बन गये.तुम्हारे
साथ ना सही, हम उन यादोंके साथ ही गुजारा
कर लेते है.   

Wednesday, September 19, 2012

गणराज अधिपती


मंगलमुर्ती गणराया

आगमन तुझे झाले आज
रस्ते सजले,अंगणी सुवासिक सडे,
रांगोळी रेखाटली ,हवेत झळकल्या
पताका उंच,घरा घरात पक्वान्न
थाटले . मोदकांची थाळी भरली
बालकांची रेलचेल झाली
दुर्वांची जुडी माथी चढली
उटी चंदनाची कपाळी
प्राजक्ताची माला गळ्यात शोभली  
भक्तगण प्रेमात न्हाऊन निघाले
तुझ्या येण्याने आप्त-स्वकीय एक झाले
सोहोळ्यात तुझ्या विसरले हेवे दावे
संपले मनातले द्वेष त्यांचे
प्रत्येकाच्या मनी एकच ध्यास
गणपती बाप्पांचा आशीर्वाद त्यांस
मोदकांचा प्रसाद प्रत्येकांस......  







Wednesday, September 12, 2012

भाव मनीचे


  

 राखीचा हा धागा साधा ,
बांधतो आपल्याला ऋणानुबंधात .
प्रेमळ रेशमाचे हे बंध
गुंफतात आपल्याला
रक्ताच्या  नात्यात   
भाव बंधनाचा हा
नाजुक रेशमी गोफ
प्रत्येक गोफात
वाढतो अंश प्रेमाचा
अशीही गुंफण मायेची
सदैव असू दे हृदयाशी
बांधशील तू मनगटावरी तेव्हा
हात ठेवशील छातीशी
क्षणात पोहोचेल संवेदना
तुझ्या हृदयाच्या तारेतून
माझ्या हृदयी
असाच असू दे हात तुझा
तुझ्या हृदया जवळी
समजेन मी आर्त तुझी तत्काळ
अन हाक माझी तुही
भाऊ नसून असशी
तू भाव माझ्या मनीचा  
असाच असू दे भाव सदैव
तुझ्याजवळी माझ्या जीवनाचा
तुमचे प्रेम व आत्मीयता
हीच सामजते भेट तुमची
मी मोठी भाग्याची 

राखीचा बंध




भाव पाठविते या धाग्यात गुंफून
अलगद बांधा ह्यांना हृदयाशी.
सहजा सहजी विस्कटू देऊ नका
ह्या मोत्यांना,मोती नसती
असती हे अश्रू माझे .
ठेवा जपून हा ठेवा .
येऊ द्या माझे आनंदाश्रू .
असली राखी जेंव्हा मनगटावरी
हात ठेवा हृदयावरी,जाणवतील
स्पंदने माझी, हेची भाव ,हीच
प्रित माझ्या मनीची
       भावनांचा बंध पाठविते
           नाजूक रेशमी धाग्याचा ......

नाती



       ----------
अतिव आनंदाच्या किंवा अतिदुखाःच्या क्षणी मनःस्थिती
कुठलाही चांगला अथवा वाईट निर्णय घेऊन चुकू शकते,
मन तेंव्हा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसते,अशा
वेळी शांत राहून कुठलाही निर्णय घेऊ नये.
     निसर्गाकडे बघावे व शिकावे ,कुठलीही परिस्थीती
आली तरी तटस्थ राहावं.चंद्र ,सूर्य,तारे यांच्या कडून
शिकावं,त्यांचा नित्यक्रम कधी कुठल्याही परिस्थितीत  
बदलत नाही. बदलतं ते रूप कधी यशस्वी ठरत नाही.
सागराला भरती-ओहोटी येणारच,म्हणून तिथे जगणारे
जीव-जंतू ,वाळु ,झाडं तटस्थच राहतात , तात्पुरते
वाकतात. पण गवताच्या पात्यासमोर रौद्ररुपी सागरही
हरतोच ...       

झटपट रवा बेसन लाडू



    -----------------------
१ कप बेसन
१ कप-  सूजी(रवा)
१ कप तूप
दीड कप साखर
१/२ कप पाणी
         
   प्रथम कढईत तूप टाकावे ,गरम झाल्यावर बेसन खमंग
भाजावे .थोडे गुलाबी झाल्यावर सुजी भाजावी.दोन्ही लालसर
गुलाबी भाजा . एका पातेल्यात दीड कप साखर व अर्धाकप
पाणी घेऊन एक तारी पाक तयार झाल्यावर गरम बेसन, 
सुजी(रवा), इच्छे नुसार काजू ,बदाम,किशमिश,वेलची व
जायफळ पूड त्यात मिसळून दहा मिनिटांनी लाडू बनवावे....