जागतिक महिला दिवस
जागतिक महिला दिवस पाळण॒या साठी एक दिवस कसं बसं बाहेर पडून प्रसंग पार पाडायचा समारंभ आटोपून वेळेचा आत घरी पोहोचून पुन्हा उंबरठ॒याच्या आत चार दिवारी मध्ये कैद व्हायचं .
जगात सर्व लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात नी घरात परतल्यावर स्त्री म्हणजे माणसाच्या पायातली चप्पल म्हणून वावरायचं पुरुष प्रधान राष्ट्रात महिलेचा सम्मान असाच आहे
बहिणाबाईच मन
बहिणा बाई अजूनही स्त्री जात्यात
भरड्या सारखी भरडली जाते
इतकी वर्ष उलटलीत तरी तुमच्या भावना
अजूनही तिच्या उरी तशाच झाकल्या राहिल्या
फरक पडला ,एकविसाव्या शतकात ..........
फरक पडला तो इतकाच
पूर्वी जात्यावर दळतांन तिने मन भरडले
पापण्या चोळून अश्रू वाहिले
मना चा कोपरा नेहमीच ओलावून ठेवला
पूर्वी सडा सारवण करतांना
शेण माती कालवले आता मात्र
आपल्या जीवाची कालवा कालव करते
पूर्वी कसं बोलता येईना म्हणून
मनातल्या मनात सलत राहायची
आजची स्त्री बोलली म्हणून
आतूनच धगधगत राहिली
कहाणी तुझी कर्माची
असे साता-जन्माची
गाठ नराधमांशी
या जन्मी वारे सोसले
दुसर॒या जन्मी उन्हाळे सोसले
तिसरया जन्मी पावसाळे
ऋतू देखील दुष्काळ पाहती
बाईचे इथे अश्रू झरती
तिथे पुरुषा तू काय साथ देशिल
या देशात स्त्रीची अशी दशा
पुरुष करती अहंकाराचा नशा
दुनिया करते स्त्रीवरच हशा