Friday, March 11, 2011

व्यथा

जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम आटोपून ऑंफीस मधून यायला आज जरा उशीरच झाला... कार पार्क करून करून घाई घाईत लिफ्ट मध्ये चढले सहाव्या मजल्याचे बटन दाबले, दार बंद झाले .......तेव्हढ्यात हुंदक्यांच्य आवाजाने माझे लक्ष वेधले .मागे वळून पाहते तर काय खाली मान घालून रडतंय....अश्रूंचा पूर लोटतोय ,गुलाबी गोऱ्या गालावरचे अश्रू पुसुन -पुसून लाल झालेले, डोळे सुजलेले...मी न रहावून जवळ गेले..म्हटलं ,काय झाले ?कोण तूं ?तोंडातून शब्द बाहेर पडेनात इतके अनावर हुंदके होते ..थोडा धीर दिल्यावर मी लक्षपूर्वक ऐकत होते. ...ती कहाणी ऐकून, मी अवाकच झाले..... आच्छर्याने मी विचारले, तुला हे कुणी सांगितले? हि तर माझी कहाणी !!! ,अन् मी तर अजून कुणाजवळ काही बोलले नाही ....तुला कसे कळले ?तर लगेच हलके मिश्किलपणे हसत ती म्हणाली ....अगं...वेडे हि तुझी किंवा माझी कहाणी नव्हे ,हि तर स्त्रीजन्माची कहाणी ...मग तुझ्या कहाणीपेक्षा वेगळी कशी असणार ?............तेव्हढयात लिफ्टचे दर उघडण्याच्या आवाजाने भानावर आले ...नि गहिवरल्या मनाने बाहेर आले ... उशीर झालेला म्हणून समोरच पोरं वाट पाहत उभी होती ,मला पाहिल्यावर येऊन बिलगली मी हि त्यांना आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतले ...इतिश्री.... म्हणूनच म्हणतात ...स्त्री जन्मा जन्मोजन्मी तुझी एकच कहाणी

Tuesday, March 8, 2011

mahila diwas

कसं असतं मुलींचं मरे पर्यंत त्या परक्याचच धन असतं’’

माझ्याच घरात राहायला मला परवानगी घ्यावी लागते....

माझ्याच रक्ताच्या नात्याला ,मला रक्ताची ओळख द्यावी लागते...

माझेच नाते जपायला मला तडजोड करावी लागते ....

माझेच अस्तित्व टिकवायला मला झगडावे लागते ....

माझीच मला स्त्री असण्याची जाणीव ठेवावी लागते .....

राजश्री .....

महिला जागतिक दिन सर्वच पाळतात.का?....तर सर्व पाळतात म्हणून आपणही पाळतो,पण अजुनही महिलांची प्रतिमा मात्र ...पाठमोरीच.तिला पूर्ण व्हायला लागते कुणाची तरी साथ....ती तिला कधीच मिळू शकत नाही,म्हणूनच तिला म्हणतात अर्धांगिनी...आता पटलं!!!

जिला साथ मिळाली ती कदाचित पूर्ण होत असेन ....?पण ,एकटीच हरवते ती या जगती....हे जगही मोठे फसवे ,स्त्रीला देते उपमा जननीजन्मभूमीची अन् उत्खलन करते तिची काया ....काय झाकण्या वरपांगी वस्त्र ..मात्र मनाने करते नग्न ...म्हटलं अजूनही बाई तुझी सावली नि तू हेच तुझे सोबती ..सगे सोयरे नसती कधी सांगाती..आज काय नि उद्या काय ? मुलगी जन्मली कि म्हणतात ,लग्नापर्यंत परक्याचं धन,अन् लग्नानंतर सासरच्यांच्या मनासारखं नाही वागलं कि सासरची म्हणतात हो घरा बाहेर.... शेवटी महिलाच जाते बळी या राष्ट्री ....राष्ट्रपती असो, असो पंतप्रधान कि असे राज्यपाल!!!!

ती शेवटी स्त्री महान.....

nauka

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नौका-नयन

जीवनाच्या ह्या नदीत माझी नौका उतरल्या पासून (जन्मापासून) सतत कुणीतरी वाहून नेतेय.वल्हवी बदलत आहेत.आज वाटलं एकटच पोहून पाहवं,तरंगाव वाटलं पाण्यात म्हणून उतरले पाण्यात ...प्रथम डगमगले...पण लगेचंच पाण्याच्या लहरींवर डोलायला लागली डोलत राहीली...डोलताना सुरुवातीस वाटलं तोल जातोय ,पण मग लक्षात आले ...कि आपण त्या लहरींबरोबर ताल धरतोय .....मनातली डूबायची भीती हळू हळू नाहीशी झाली ..तोल सांभाळता सांभाळता तालात, डौलात पोहायला शिकले ......आता स्वच्छन्द बागडायला लागले असं बागडणं जे कित्येक वर्षां पासून हिरावून घेतलं होतं....आज मात्र मी स्वतःच मार्ग आक्रमण करीत होते.... .... निरागस, स्वच्छंदी,अल्लड लहरींबरोबर, बिनधास्त मदमस्त डोलत होते,,,,,,हव्या त्या किनाऱ्यावर पोहोचण्याची माझी इच्छा पूर्ण होत होती...वृक्षाची तटस्थता,वेलींचे नाजूक सळसळने,फुलांचे सुगंधी दरवळणे .वाऱ्याचा लटकी स्वभाव ,लहरींची चंचल मिश्किली, आकाशाचें निरभ्र आच्छादन ,सूर्याचा तेजस्वी कटाक्ष चंद्राचे स्मित हास्य, चांदण्यांचा चोखंदळपणा आणि माझा स्त्री होण्याच्या अभिमानात मी माझे अमूल्य वरदान स्वीकारीत अभय आनंद लुटत माझे जीवन रंगवीत आहे