Monday, February 28, 2011

gharte

तुम्ही जोडलेल्या मनाचा दुवा आहोत आम्ही

तुम्ही स्वीकारलेल्या बंधनांची रेशमी डोर आहोत आम्ही

तुम्ही जोपासलेली मूल्ये आहोत आम्ही

तुम्ही रंगविलेल्या स्वप्नांची इंद्रधनुषी कमान आहोत आम्ही

दोघांच्या नजरेतील प्रतिमा आहोत आम्ही

तुमच्या विश्वासाच प्रतिक आहोत आम्ही

तुमच्या आत्मविश्वासाचे बीज आहोत आम्ही

तुमच्या आशेचे किरण आहोत आम्ही

तुमच्या जीवाचे प्राण आहोत आम्ही

तुमच्या पुण्याईचे आशीर्वाद आहोत आम्ही

तुमच्या संस्काराची तीजोरी आहोत आम्ही

तुमच्या आकाश-गंगेतील सप्तर्षी आहोत आम्ही

तुमच्या वटवृक्षाची सावली आहोत आम्ही

तुमच्या तळ्यातील राजहंस आहोत आम्ही

तुमच्या बागेतील फुलं आहोत आम्ही

तुमच्या सागराच्या लाटा आहोत आम्ही

तुमच्या नदीची नौका आहोत आम्ही

तुमच्या विवंचनाचे जाळे आहोत आम्ही

आमच्या शक्तीची प्रेरणा आहात तुम्ही

आमच्या जीवनाचे अर्थ आहात तुम्ही

आम्ही पांघरलेल्या शालीची उब आहात तुम्ही

prem bandhan

तीर्थरूप आई बाबांस सप्रेम नमस्कार ..

पन्नास वर्षा पासून

गुंफित आलेला शेला

ताणा- बाणा विणत गेला

विनताना आईचा कशीदा

शेल्याची नाजुकता वाढवित होता

प्रत्येक ताण्यात तुमच्या दोघांची

प्रेमाची उब साठवत होता विणता-विणता

कशीद्याचा प्रत्येक रंग

जीवनात आमच्या उतरत होता

रेशमाचा एक-एक धागा

मनाला स्पर्शुन सांगत होता

ह्याच दिवशी विणायला घेतलेला शेला

आज एककावनावा धागा

ताण्यात बांधत होता

ताण्यानी बाण्याला घट्ट करीत होते

एक एका धाग्याला प्रेमाचा पीळ होता

इन्द्रधनुषी रंगाचा कशीदा

आनंदाची उधळण करीत

विविध मनांची जुळवणी करीत आला

असेच गुंफून ताणा-बाणा

पूर्ण करू हा शेला आपुला