Wednesday, June 2, 2010

मुद्दाम

रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
कॉलेजला जाता येतांना मात्र
मी खाली मान घालायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
मंदिरात जातांना ओंजळीत
सुगंधी फुलं न्यायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
गुलाबाला पाणी देतांना
स्मितहास्य करायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
ओल्या केसांना सुकविण्यास
उन माखत बसायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
सुर्याला अर्ध्य देतांना
तुझ्या नजरेत नजर मिळवायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
तुळशीला नमस्कार करतांना
तुझी आराधना करायची
रोजच तुला मी खिडकीत उभं पाहायची
चतुर्थीच्या चंद्राच्या निमित्तानं
गच्चीवरून तुलाच न्याहाळायची ...पण
आज अचानक तुला समोर उभं पाहून
मी माझं सर्वस्व विसरली......

2 comments:

  1. Pahilyandach aale hya blog war...mastach aahe.... :)
    aani Nasheeb kavita tar Apratim aahe...

    ReplyDelete
  2. Hi Maithili....
    Thanks
    नव्यानेच हे उपद्व्याप सुरु केलेत....
    तुझ्या हि ब्लोग वर गेले, तू खूपच छान लिह्तेस
    महत्वाच सांगायचं म्हणजे तुझ्या प्रोंफाइल बद्दल
    “अबाउट मी ” तू खूपच निरागस आहेस ..........

    राजश्री ...........

    ReplyDelete