तुम्ही जोडलेल्या मनाचा दुवा आहोत आम्ही
तुम्ही स्वीकारलेल्या बंधनांची रेशमी डोर आहोत आम्ही
तुम्ही जोपासलेली मूल्ये आहोत आम्ही
तुम्ही रंगविलेल्या स्वप्नांची इंद्रधनुषी कमान आहोत आम्ही
दोघांच्या नजरेतील प्रतिमा आहोत आम्ही
तुमच्या विश्वासाच प्रतिक आहोत आम्ही
तुमच्या आत्मविश्वासाचे बीज आहोत आम्ही
तुमच्या आशेचे किरण आहोत आम्ही
तुमच्या जीवाचे प्राण आहोत आम्ही
तुमच्या पुण्याईचे आशीर्वाद आहोत आम्ही
तुमच्या संस्काराची तीजोरी आहोत आम्ही
तुमच्या आकाश-गंगेतील सप्तर्षी आहोत आम्ही
तुमच्या वटवृक्षाची सावली आहोत आम्ही
तुमच्या तळ्यातील राजहंस आहोत आम्ही
तुमच्या बागेतील फुलं आहोत आम्ही
तुमच्या सागराच्या लाटा आहोत आम्ही
तुमच्या नदीची नौका आहोत आम्ही
तुमच्या विवंचनाचे जाळे आहोत आम्ही
आमच्या शक्तीची प्रेरणा आहात तुम्ही
आमच्या जीवनाचे अर्थ आहात तुम्ही
आम्ही पांघरलेल्या शालीची उब आहात तुम्ही
No comments:
Post a Comment