जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नौका-नयन
जीवनाच्या ह्या नदीत माझी नौका उतरल्या पासून (जन्मापासून) सतत कुणीतरी वाहून नेतेय.वल्हवी बदलत आहेत.आज वाटलं एकटच पोहून पाहवं,तरंगाव वाटलं पाण्यात म्हणून उतरले पाण्यात ...प्रथम डगमगले...पण लगेचंच पाण्याच्या लहरींवर डोलायला लागली डोलत राहीली...डोलताना सुरुवातीस वाटलं तोल जातोय ,पण मग लक्षात आले ...कि आपण त्या लहरींबरोबर ताल धरतोय .....मनातली डूबायची भीती हळू हळू नाहीशी झाली ..तोल सांभाळता सांभाळता तालात, डौलात पोहायला शिकले ......आता स्वच्छन्द बागडायला लागले असं बागडणं जे कित्येक वर्षां पासून हिरावून घेतलं होतं....आज मात्र मी स्वतःच मार्ग आक्रमण करीत होते.... .... निरागस, स्वच्छंदी,अल्लड लहरींबरोबर, बिनधास्त मदमस्त डोलत होते,,,,,,हव्या त्या किनाऱ्यावर पोहोचण्याची माझी इच्छा पूर्ण होत होती...वृक्षाची तटस्थता,वेलींचे नाजूक सळसळने,फुलांचे सुगंधी दरवळणे .वाऱ्याचा लटकी स्वभाव ,लहरींची चंचल मिश्किली, आकाशाचें निरभ्र आच्छादन ,सूर्याचा तेजस्वी कटाक्ष चंद्राचे स्मित हास्य, चांदण्यांचा चोखंदळपणा आणि माझा स्त्री होण्याच्या अभिमानात मी माझे अमूल्य वरदान स्वीकारीत अभय आनंद लुटत माझे जीवन रंगवीत आहे
No comments:
Post a Comment