ओंजळी भरुन फुलांची घेतांना
काही फुलं ओंजळीतुन सांडली....
खाली पडलेल्या फुलाकडे पाहून, म्हटलं!!!
असं असतं नशीब!!!
एकाच झाडाचे
एकाच टोपलीत वेचलेले
ओंजळीत भरतांना
काही फुलं ओंजळीत आली
काही जमिनीवर सांडली.....
ओंजळीतली फुलं हसत होती,
जमिनीवरची केविलवाणी पहात होती.....
ओंजळीतील फुलं म्हणजे नशीब.....नी
जमिनीवर सांडलेली फुलं
म्हणजे....नियती!!!
राजश्री नाथक
सुरेख. हा असा फुलांचा पडलेला सडा जेव्हा दुसऱ्या दिवशी केरसुणीने साफ केला जातो तेव्हा खुप दु:ख होते
ReplyDeletemanus ekda nashib badlau shakto paan niyati cha dav jinku shakat nahi
ReplyDeleteThanks
ओंजळीतील फुलं म्हणजे नशीब.....नी
ReplyDeleteजमिनीवर सांडलेली फुलं
म्हणजे....नियती!!
faarch chhan