Tuesday, March 8, 2011

mahila diwas

कसं असतं मुलींचं मरे पर्यंत त्या परक्याचच धन असतं’’

माझ्याच घरात राहायला मला परवानगी घ्यावी लागते....

माझ्याच रक्ताच्या नात्याला ,मला रक्ताची ओळख द्यावी लागते...

माझेच नाते जपायला मला तडजोड करावी लागते ....

माझेच अस्तित्व टिकवायला मला झगडावे लागते ....

माझीच मला स्त्री असण्याची जाणीव ठेवावी लागते .....

राजश्री .....

महिला जागतिक दिन सर्वच पाळतात.का?....तर सर्व पाळतात म्हणून आपणही पाळतो,पण अजुनही महिलांची प्रतिमा मात्र ...पाठमोरीच.तिला पूर्ण व्हायला लागते कुणाची तरी साथ....ती तिला कधीच मिळू शकत नाही,म्हणूनच तिला म्हणतात अर्धांगिनी...आता पटलं!!!

जिला साथ मिळाली ती कदाचित पूर्ण होत असेन ....?पण ,एकटीच हरवते ती या जगती....हे जगही मोठे फसवे ,स्त्रीला देते उपमा जननीजन्मभूमीची अन् उत्खलन करते तिची काया ....काय झाकण्या वरपांगी वस्त्र ..मात्र मनाने करते नग्न ...म्हटलं अजूनही बाई तुझी सावली नि तू हेच तुझे सोबती ..सगे सोयरे नसती कधी सांगाती..आज काय नि उद्या काय ? मुलगी जन्मली कि म्हणतात ,लग्नापर्यंत परक्याचं धन,अन् लग्नानंतर सासरच्यांच्या मनासारखं नाही वागलं कि सासरची म्हणतात हो घरा बाहेर.... शेवटी महिलाच जाते बळी या राष्ट्री ....राष्ट्रपती असो, असो पंतप्रधान कि असे राज्यपाल!!!!

ती शेवटी स्त्री महान.....

2 comments:

  1. राजश्री ,नमस्कार
    मनातल्या भावना तुम्ही अतिशय संवेदनशील पणे मांडल्या त .
    महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छां

    ReplyDelete
  2. जिला साथ मिळाली ती कदाचित पूर्ण होत असेन ....?
    Ho kharch saath deli nahi tar to satidaarach kay...

    Khup Chan Vichar..

    Rajesh Shelar

    ReplyDelete