Friday, March 11, 2011

व्यथा

जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम आटोपून ऑंफीस मधून यायला आज जरा उशीरच झाला... कार पार्क करून करून घाई घाईत लिफ्ट मध्ये चढले सहाव्या मजल्याचे बटन दाबले, दार बंद झाले .......तेव्हढ्यात हुंदक्यांच्य आवाजाने माझे लक्ष वेधले .मागे वळून पाहते तर काय खाली मान घालून रडतंय....अश्रूंचा पूर लोटतोय ,गुलाबी गोऱ्या गालावरचे अश्रू पुसुन -पुसून लाल झालेले, डोळे सुजलेले...मी न रहावून जवळ गेले..म्हटलं ,काय झाले ?कोण तूं ?तोंडातून शब्द बाहेर पडेनात इतके अनावर हुंदके होते ..थोडा धीर दिल्यावर मी लक्षपूर्वक ऐकत होते. ...ती कहाणी ऐकून, मी अवाकच झाले..... आच्छर्याने मी विचारले, तुला हे कुणी सांगितले? हि तर माझी कहाणी !!! ,अन् मी तर अजून कुणाजवळ काही बोलले नाही ....तुला कसे कळले ?तर लगेच हलके मिश्किलपणे हसत ती म्हणाली ....अगं...वेडे हि तुझी किंवा माझी कहाणी नव्हे ,हि तर स्त्रीजन्माची कहाणी ...मग तुझ्या कहाणीपेक्षा वेगळी कशी असणार ?............तेव्हढयात लिफ्टचे दर उघडण्याच्या आवाजाने भानावर आले ...नि गहिवरल्या मनाने बाहेर आले ... उशीर झालेला म्हणून समोरच पोरं वाट पाहत उभी होती ,मला पाहिल्यावर येऊन बिलगली मी हि त्यांना आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतले ...इतिश्री.... म्हणूनच म्हणतात ...स्त्री जन्मा जन्मोजन्मी तुझी एकच कहाणी

No comments:

Post a Comment