Sunday, August 26, 2012

मला वाटतं .....


निळ्या शुभ्र आकाशाकडे पाहतांना
पक्षी मला ह्वावेसे वाटते ....
उंच भरारी  घेतांना आभाळाला मिठी मारत 
गगन चुंबावेसे  वाटते ..
काळ्याभोर नभाकडे पाहतांना
पाऊस मला व्हावेसे वाटते ..
पाऊस होऊन मुसळधार
तळ्यात  डूबावे वाटते ..
तळ्यातील चंद्राच्या प्रतीबिम्बात
स्वतःला न्याहाळत बसावे वाटते..नि चंद्राला न्याहाळताना
त्याची मंद ,धुंद ,शीतल   छाया  बनून   चंद्रा  सोबत   राहावे वाटते..
हिरवी पाने पाहून , गार  वारा  मला व्हावेसे वाटते नि
मनाला हलकेच स्पर्शुन
हिंदोळ्यावर गीत गुणगुणावे वाटते   

      तुझ्यात मी

तुझ्या लांब काळ्याभोर केसांवर
पडलेली सूर्याची कोवळी किरणं ,
माझ्या डोळ्यात भरत होती .
तुझ्या गोऱ्या कोमल गालाची लाली
माझ्या उरात रंगत होती.
तुझ्या हनुवटीवरची खळी,
मनात माझ्या खोलवर रुजत होती.
तुझ्या यौवनाचा भार,
माझ्या हृदयात दाटत होता ..
तुझ्या टपोऱ्या डोळ्यातील किरणं,
मला छेदीत होती .
तुझ्या  शरीराचा मादक सुगंध,
मला तुझ्याकडे खेचत होता...
तुझा काही रोष नव्हता,
ह्यात माझा काही दोष नव्हता ...
हा सर्व मर्म बंधाचा खेळ होता... 
नव्या नात्याचा जन्म होता...
प्रेमाचा उगम होता ..
रेशिमगाठींचा स्पर्श होता ...
असा तुझा सहवास होता ....

Wednesday, August 22, 2012

kahi shabda

"kahi shabda maze tya bhavnana jagavat hote .... kahi shabda tumache mazya swapnana fulvat hote ...tyach swapnantil bhavnana aaj umalayala,, mi kavitene zulvat hote....ti rachana chitranganat bagadatana ,,mich kashi ekati nyahalat hoti ...."






काही शब्द

काही शब्द माझे ,त्या भावनांना जागवत होते.
काही शब्द तुमचे माझ्या स्वप्नांना फुलवत  होते .
त्याच स्वप्नांतील भावनांना आज उमलायला ,
मी कवितेने जुळवत होते.
ती रचना चित्रांगणात बागडताना.
मीच कशी एकटी न्याहाळत होते.नि ...
हलकेच मनाच्या हिंदोळ्यावर झुलवत होते 

Tuesday, August 14, 2012

जीवन


     
क्षणभंगूर हे जीवन तुझे
तरी धडपडे जीवा पलीकडे.
आले कितीही हाती तरी
प्रत्येक वेळी हात पसरवी.
सर्व सुखांना विसरून
दुःखाचीच करतोस गणती.
आल्या संधीला तू दूर सारतोस
मूकतोस तू भाग्याला.
भूक भागली तरी
लागतोस  टूकणी तू  
ताटातल्या भाकरीवरी.
तहान शमण्या जवळ
विहीर असूनही
घोटभर पाण्यासाठी 
प्राण पणाला लावी.
असा कसा रे वेड्या माणसा
कधी न तु  होशी शहाणा.
शहाणपण येई तेंव्हा
होशील देवास लाडका ...... 
               
 
  

मी पाहिलेले


    


त्या खट्याळ हवेला
 मी  शांत पाहिले ..       
त्या सळसळणारया पानांना
मी गंभीर  पाहिले..
त्या किलबिलणारया पक्षांना
मी मुके  पाहिले... 
त्या चंचल ढगांना
मी स्तब्ध पाहिले...
त्या कडकडणारया विजांना
मी अबोल  पाहिले....
त्या बेधुंद पावसाला
मी रुसलेले पाहिले
त्या अवखळ धारांना
मी तटस्थ पाहिले
त्या झुळझुळणारया झरयाला
मी थांबलेले पाहिले
त्या मिश्कील लाटांना
मी स्थिरावलेले पाहिले
मात्र हे अनुभवणाऱ्या माझ्याच या मनाला
मी न कधी पाहिले 

Friday, August 10, 2012

khuskhusit kanda bhaji





पावसाची रिमझिम  नि कांद्याची भजी
श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे
अशा वेळी मस्त खुसखुशीत कान्देभजी, वा !  काय
मज्जा ..... मग काय वाट पहायची;;;;; उठा.....
        कांदे बारीक लांब कापलेले ,
         चमचा मीठ
१/२ चमचाओवा
१ बारिक कापलेली हिरवी मिरची
१/२ लिंबू
चिमुटभर हळद अन् साखर
एकत्र मिक्स करून ठेवा,
कढईत तेल गरम करे पर्यंत कांद्याला पाणी सुटेल, बस... त्यात
४ मोठे चमचे बेसन भूरभूरा, मिसळा आणि मंद आचेवर गुलाबी होईस्तो तळून  
चहाच्या सोबत खट्याळ पावसाच्या संगतीन आस्वाद घेतांना सोबतीला नवरा नसेल तर   मैत्रिणीला विसरू नका.......      

Wednesday, August 1, 2012

खरंच तुझ्या सवे

खरंच तुझ्या सवे
 मी बालपणी खेळले होते कां?
लपाछपी खेळतांना कधी 
मी हरवले होते कां?
खरंच तुझ्या सवे
 मी भातुकली मांडली होती कां?
खेळामधले सर्व डाव
 तूच जिंकला होतास कां?
खरंच तुझ्या सवे
माझे तारुण्य बहरले कां?
बहरतांना माझे सौंदर्य
 तूच टिपले होतेस कां ?
खरंच तुझ्या सवे
मी वडाच्या सावलीत बसले होते कां?
पारंब्यांना लटकून
तूच मला झुलवले होते कां?
 खरंच तुझ्या सवे
मी पावसात चिंब भिजले होते कां?
पण पावसाच्या त्या सरींनी
 कांय  मलाच ओले केले होते कां?
  खरंच तुझ्या सवे
मी नदीच्या तिरी वाळूचे घर बनवले होते कां ?
नि अल्लड लटक्या लाटेने घर मोडलेले 
आपण दोघांनी  पहिले होते कां ?
 खरंच तुझ्या सवे 
मी रात्री हातात हात घालून चालत होते कां?
चांदण्यांच्या  मंद प्रकाशात हात माझा 
तूच  झटकला होतास कां ?
 खरंच तुझ्या सवे
 मी 
गीत गुणगुणले होते कां ?
प्रेम गीत गातांना सूर तूच छेडले होते कां ?
 खरंच तुझ्या सवे मी 
मखमली हिरवळीवर चंद्र पौर्णिमेचा पाहत होते कां ?
चंद्राला निरखून पाहतांना कुशीत तुझ्या तेव्हां  मीच  जवळ होते कां ?
 खरंच तुझ्या सवे
 मी तुझ्या स्वप्नात रमली कां ?
स्वप्नात रमले असतांना तूच स्वप्नभंग केले कां?
  खरंच तुझ्या सवे
 मी उंबरठा ओलांडला होता कां?
उंबरठा ओलांडतांना मी कधी मर्यादांत अडखळले होते कां?
   खरंच तुझ्या सवे
 मी प्रेमाच्या शपथा घेतल्या होत्या कां ?
घेतल्या शपथातील एक तरी शपथ तुला आठवते कां ?
 खरंच तुझ्या सवे
 मी  संसार-चित्र रंगविली कां ? 
रंगवतांना चित्र माझे तूच बेरंग केले  होते कां?
खरच तुझ्या सवे 
 मी जीवनपूर्ण जगले कां ?
जीवन जगता जगता माझे जगणे  अधुरे  राहिले कां ?
 खरच तुझ्या सवे
 मी आरश्यात  आपली प्रतिमा न्याहाळत होती कां ?
कां--  ती प्रतिमा तुझां आभास करत होती कां?