मंगलमुर्ती गणराया
आगमन तुझे झाले आज
रस्ते सजले,अंगणी
सुवासिक सडे,
रांगोळी रेखाटली ,हवेत
झळकल्या
पताका उंच,घरा घरात
पक्वान्न
थाटले . मोदकांची
थाळी भरली
बालकांची रेलचेल
झाली
दुर्वांची जुडी माथी
चढली
उटी चंदनाची कपाळी
प्राजक्ताची माला
गळ्यात शोभली
भक्तगण प्रेमात
न्हाऊन निघाले
तुझ्या येण्याने
आप्त-स्वकीय एक झाले
सोहोळ्यात तुझ्या
विसरले हेवे दावे
संपले मनातले द्वेष
त्यांचे
प्रत्येकाच्या मनी
एकच ध्यास
गणपती बाप्पांचा
आशीर्वाद त्यांस
मोदकांचा प्रसाद
प्रत्येकांस......
No comments:
Post a Comment