Thursday, September 20, 2012

पाहुणा


                 
नेहमीच काही आठवणी दुःख देतात असे नाही,काही सुखाऊनही नेतात
अशाच काही आठवणींनी मन भरून आले.
       खरंय माझ्याजवळ स्वतःच चार भिंतीच असं घर नाही,पण
घरपण देणारी माणसं मात्र मिळवलीत .त्या प्रत्येक माणसांच्या
मनात मी व माझ्या मनात त्या प्रत्येकानं घर केलं होतं.आयुष्यात
मला धन्य वाटते ती याची कि मला माणसं कमावता आलीत,याचा
अर्थ मी माणसं विकत घेतली असा नव्हे.प्रेमानं आपलंसं केलं.अर्थात
त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या वाट्याला मी माझ्या प्रेमानं बेरीज न करता
चक्क गुणले त्यामुळे ते प्रेम आजही मला पुरतंय.
        आजकाल लोकांना घरी बोलावूनही एकमेकांकडे येत नाहीत.
पण माझ्याकडे न बोलावता येतात.पुन्हा पुन्हा येतात हे माझे भाग्य
समजते कारण येतांना प्रत्येक पराका येतो नी आपला समजून परत
जातो,आपुलकीनं पुन्हा येतो तेंव्हा आपलंसं करून परत जातो, नी पुन्हा
आपलंसं म्हणून येतो, नी नातं जुळवून जातो आपलेपणाचं. सख्ख होऊन
मायेची उब देतो. असा माझा आपुलकीचा प्रेमाच्या कमाईतून मिळालेला
भर भक्कम बुरुजरुपी वाद्यातला पाहुणचार अनुभवायला कधी विसरू नका.......          

No comments:

Post a Comment