भाव पाठविते या
धाग्यात गुंफून
अलगद बांधा ह्यांना
हृदयाशी.
सहजा सहजी विस्कटू
देऊ नका
ह्या मोत्यांना,मोती
नसती
असती हे अश्रू माझे
.
ठेवा जपून हा ठेवा .
येऊ द्या माझे
आनंदाश्रू .
असली राखी जेंव्हा
मनगटावरी
हात ठेवा
हृदयावरी,जाणवतील
स्पंदने माझी, हेची
भाव ,हीच
प्रित माझ्या मनीची
भावनांचा बंध पाठविते
नाजूक रेशमी धाग्याचा ......
No comments:
Post a Comment